translate this site

hindi

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

मनोविकार…

आजार असे मनाचा विकार

मन प्रसन्न त्यासी आजार शून्य,

का जोपासि तू हा दूराचार

ठेव मनाला सदा प्रसन्न।।

Posted in जीवन | Tagged | मनोविकार… वर टिप्पण्या बंद

कठपुतळी

मनी ईश्वरा सर्वदा पूजित जावे,

त्याच्या विना जग हे नसावे।।

जगी सर्व त्याच्या खातर घडतसे,

आम्हा तयाची कठपुतळी जाणावे।।३०।।

Posted in प्रवर्ग नसलेले | 2 प्रतिक्रिया

बेरंग…।

तेव्हा सर्व जाती घरोघरी

कराया दिवाळी साजरी

आता नसे तसा रंग

केली दिवाळी बेरंग।।२९ ।।

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

भाऊबीज

भाऊ करी बहिणीचे लाड,

बहिणीस भाऊ सदा गोड

पैका न येई प्रेमा आड

मना हे नाते सर्वदा असे राहो।।२८।।

(चित्र:गुगल वरून साभार)

Posted in सण | Tagged | यावर आपले मत नोंदवा

दिवाळी…

माझ्या मना फटाके करीति प्रदूषण,

प्राणी श्वास कसे घेतील जाण;

साधी करा साजरी दिवाळी,

लावा दिव्यांची दारी हो लळी।।२७ ।।

(चित्र: गुगलवरून साभार)

Posted in प्रवर्ग नसलेले, सण | Tagged | यावर आपले मत नोंदवा

का आला आहेस तू…..

माझ्या मना जे जे कमवून गेले,

सर्व येथेच ठेऊन गेले।

पैका अडका का सोबत

नेण्या आला आहेस तू?//२६//

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

झाडे…२

माझ्या मना झाडे करी प्रदूषण दूरी,

मुळे ज्यांची सदा धरनी धरी।

कधी न वाहून जाईल नीर त्याने,

अशी बहुउपयोगी झाडे लावावी।।२५।।

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

निसर्ग..

माझ्या मना निसर्ग जोपासावे,

घनदाट झाडे ती पोसावी।

मोह फळांचा असू द्यावा,

झाडा करवी।।२४।।

Posted in जीवन, झाडे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

झाडे…१

माझ्या मना प्रथम जागा हेरावी,

नंतर तेथे झाडे लावावी।

देईल जे सढळ हस्ते परतावे,

न विसरता त्याशी जल देत जावे।।२३।।

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

जीवन

मोती सम असावे आपुले जीवन,

निर्मळ ज्याचं असतं दागिनं;

नसे जर जीवन तैसे,

शोधावे तयाचे आपण साधन//२२ //

Posted in जीवन | Tagged | यावर आपले मत नोंदवा