Author Archives: Ravindra

About Ravindra

I am an Electrical Engineer having experience of 32 years in service & now retired. I like to write poems, draw sketches,paintings, sculpture making etc., since my childhood. I used to write poems in Marathi my mother tongue and Hindi also.

मनोविकार…

आजार असे मनाचा विकार मन प्रसन्न त्यासी आजार शून्य, का जोपासि तू हा दूराचार ठेव मनाला सदा प्रसन्न।।

Posted in जीवन | Tagged

कठपुतळी

मनी ईश्वरा सर्वदा पूजित जावे, त्याच्या विना जग हे नसावे।। जगी सर्व त्याच्या खातर घडतसे, आम्हा तयाची कठपुतळी जाणावे।।३०।।

Posted in प्रवर्ग नसलेले | 2 प्रतिक्रिया

बेरंग…।

तेव्हा सर्व जाती घरोघरी कराया दिवाळी साजरी आता नसे तसा रंग केली दिवाळी बेरंग।।२९ ।।

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

भाऊबीज

भाऊ करी बहिणीचे लाड, बहिणीस भाऊ सदा गोड पैका न येई प्रेमा आड मना हे नाते सर्वदा असे राहो।।२८।। (चित्र:गुगल वरून साभार)

Posted in सण | Tagged | यावर आपले मत नोंदवा

दिवाळी…

माझ्या मना फटाके करीति प्रदूषण, प्राणी श्वास कसे घेतील जाण; साधी करा साजरी दिवाळी, लावा दिव्यांची दारी हो लळी।।२७ ।। (चित्र: गुगलवरून साभार)

Posted in प्रवर्ग नसलेले, सण | Tagged | यावर आपले मत नोंदवा

का आला आहेस तू…..

माझ्या मना जे जे कमवून गेले, सर्व येथेच ठेऊन गेले। पैका अडका का सोबत नेण्या आला आहेस तू?//२६//

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

झाडे…२

माझ्या मना झाडे करी प्रदूषण दूरी, मुळे ज्यांची सदा धरनी धरी। कधी न वाहून जाईल नीर त्याने, अशी बहुउपयोगी झाडे लावावी।।२५।।

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

निसर्ग..

माझ्या मना निसर्ग जोपासावे, घनदाट झाडे ती पोसावी। मोह फळांचा असू द्यावा, झाडा करवी।।२४।।

Posted in जीवन, झाडे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

झाडे…१

माझ्या मना प्रथम जागा हेरावी, नंतर तेथे झाडे लावावी। देईल जे सढळ हस्ते परतावे, न विसरता त्याशी जल देत जावे।।२३।।

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

जीवन

मोती सम असावे आपुले जीवन, निर्मळ ज्याचं असतं दागिनं; नसे जर जीवन तैसे, शोधावे तयाचे आपण साधन//२२ //

Posted in जीवन | Tagged | यावर आपले मत नोंदवा