……..सर्व सोडून द्यावे/

images copy

Advertisements
इमेज | Posted on by | यावर आपले मत नोंदवा

मनराई ची रेंक

माझ्या मनाच्या कविता खूप अश्या मी यां ब्लोग वर टाकलेल्या नाहीत. तरी ही त्याची रेंक वाढत आहे. ह्याचा मला अभिमान वाटत आहे.

 

FireShot Screen Capture #032 – ‘IndiStats – IndiRank, Alexa, Pagerank, Feed info, Posting Frequency and helpful tips’ – www_indiblogger_in_mystats

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

इमेज | Posted on by | यावर आपले मत नोंदवा

मनाच्या कविता- ३ री ओवी

माझ्या मना देव पूजित जावे/
देवाने दिला देह त्याचाच मानावे//
पाषाणात हि देव हे ध्यानी धरावे/
देवा कधी न विसरावे//३//

अर्थात माझ्या मना नेहमी देवाची पूजा करीत राहावे. आपल्याला देवानेच जन्म दिला आहे, हा देह त्याने आपल्याला दिला आहे त्यामुळे हा देह त्याची आपल्याकडील धरोहर आहे असे मानावे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावि कि दगडात सुध्दा देव असतो. म्हणून त्याचे आपल्यावर उपकार आहेत असे मानून त्याला कधीच विसरू नये.

Posted in प्रवर्ग नसलेले | 2 प्रतिक्रिया

मनाच्या कविता- दुसरी ओवी

माझ्या मना सदा हसत जगावे/
मनी चिंता कधी न बाळगावे//
जीवन असे तोवर निश्चिंत राहावे/
सदा सर्वदा प्रेमाने बोलावे//२//

हे मना, नेहमी हसत हसत जगावे. अरे पण लक्षात ठेव प्रसंग बघून हसावे. नाही तर मृत्यूच्या ठिकाणी सुध्दा तू हसत हसत बोलशील. हसत जगावेचा अर्थ आहे आलेल्या प्रत्येक संकटाला खचून न जाता धैर्याने सामोरे जाणे. काय होईल काय होईल अशी चिंता बाळगत भविष्यातील प्रसंगांची वाट बघत बसू नये. देवाने आपल्याला जितके जीवन दिले आहे तितके आपण जगणारच. हे विधिलिखित कोणी ही बदलू शकत नाही. मग चिंता कसली करतोस? जा निश्चिंत राहा आणि मजेशीर जीवन जग. सर्वांशी प्रेमाने बोल. आपली वाणी सुधारून टाक.

Posted in जीवन | यावर आपले मत नोंदवा

translate this site

hindi

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

//मनाच्या कविता//

मित्रांनो, हा ‘मनाच्या कविता’ नावाचा ब्लॉग मी ५ सेप्टेम्बर २००९ रोजी खऱ्या अर्थाने प्रकाशित केला होता. बऱ्याच काळानंतर आज मी ह्या माझ्या महत्वाच्या ब्लॉगला सुधारित करत आहे.

हा ब्लॉग मी रामदास स्वामीच्या ‘मनाचे श्लोक’ पासून प्रेरित होऊन आजच्या जगाला शोभून दिसेल व आज जे काही घडत आहे त्याचा विचार करून ओव्या तयार करायचा प्रयत्न केला आहे.

आधी मी या ब्लॉगवर सरसकट सर्व ओव्या टाकल्या होत्या. आज मी असा विचार केला कि प्रत्येक ओवीचा अर्थ व ती लिहिण्यामागे माझ्या मनात काय दडले आहे ते सांगायचा येथे प्रयत्न करिन, जेणेकरून वाचकाला अर्थ व भावार्थ समजण्यात अडचण येणार नाही.

“जय जय रघुवीर समर्थ”

आजची माझी ही पहिली ओवी मी स्वामीजींना समर्पित करतो.

माझ्या मना दुख करू नको हे/
मना नेहमी शोक धरू नको हे//
झाले गेले सर्व सोडून द्यावे/
सदा सुखी जीवन व्यतीत करावे//१//

अर्थात

आज मनुष्य रोज-रोजच्या धकाधकीच्या जीवनात अत्याधिक व्यस्त व व्यग्र आहे. सर्वांच्या पुढे जाण्याची येथे स्पर्धा लागली आहे. जो मागे राहून जातो तो दुःखी होतो. जो मागे राहिल्याने दुःखी होत नाही तोच समाधानी असतो. आणि असा समाधानी मनुष्य आपल्या मनाला म्हणतो “तू शोक करू नकोस जे झाले गेले ते विसरून जा”. आणि “आपल्या नेहमीच्या जीवनात व्यस्त होऊन समाधानी राहा व सुखी जीवन व्यतीत कर”. जो अशा प्रकारे विचार करून जगतो तोच सुखी जीवन जगू शकतो.

Posted in जीवन | Tagged | 5 प्रतिक्रिया